बल्लारपूर (जिल्हा चंद्रपूर) येथील श्री हनुमानाच्या मूर्तीच्या तोडफोड प्रकरणी पालकमंत्र्यांकडून पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश !
बल्लारपूर (जिल्हा चंद्रपूर) – बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावानजीक विवकुंड नाल्याजवळ श्री हनुमानाच्या मूर्तीची काही समाजकंटकांनी तोडफोड केली होती. धार्मिक भावना दुखावल्याने नागरिक संतप्त झाले असून विसापूर गावामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावानजिक श्री हनुमान मुर्तीची काही समाज कंटकांनी तोडफोड केल्याप्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना सदर प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले@SMungantiwar @MahaDGIPR
More Infohttps://t.co/yM9Yr87ffY— DISTRICT INFORMATION OFFICE, CHANDRAPUR (@InfoChandrapur) November 24, 2022
परिस्थिती चिघळू नये; म्हणून तातडीने पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणावी, तसेच त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.