शहरातील पथदिवे बंद असल्यास ‘ऑनलाईन’ तक्रार करा ! – शीतल तेली-उगले, आयुक्त, महापालिका
सोलापूर – शहरातील पथदिवे बंद राहू नयेत, यासाठी महापालिका काळजी घेत आहे. तरीही शहरातील पथदिवे बंद अवस्थेत आढळल्यास नागरिकांनी ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट करावी. २४ घंट्यांच्या आत दिवे चालू करण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली. यासाठी ‘ई.ई.एस्.एल्. संपर्क’ हे ‘ॲप’ ‘डाऊनलोड’ करून घ्यावे, असे आवाहन महापालिका विद्युत् विभागाच्या वतीने केले आहे.