राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने ८७ लाखांचा मद्यसाठा केला शासनाधीन !
पुणे – गोवा राज्य निर्मित आणि केवळ गोवा राज्यात विक्री करत असलेल्या विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणार्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव विभाग, पुणे यांनी कारवाई करून ८७ लाख रुपयांचा मद्यसाठा शासनाधीन केला आहे. तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर, हॉटेल शांताई समोरील रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई केली.
वाहनचालक प्रवीण पवार आणि देविदास भोसले यांना कह्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.