५० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना बाजार समितीचा सचिव पोलिसांच्या कह्यात !
सातारा – गाळा भाड्याने देण्याकरिता मागितलेली लाच स्वीकारतांना माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा सचिव रमेश रामभाऊ जगदाळे (वय ५६ वर्षे) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून रंगेहात कह्यात घेण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार म्हसवड येथील गाळा भाड्याने मिळण्याकरिता तक्रारदाराने सचिव रमेश जगदाळे यांच्याकडे मागणी केली होती. हे काम करण्यासाठी रमेश जगदाळे यांनी तक्रारदाराकडे ५० सहस्र रुपयांची मागणी केली होती. याविषयीची तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराने पोखरलेली आणि भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झालेली शासकीय कार्यालये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आहेत, हे लज्जास्पद ! |