शवागारातील वातानुकूलन यंत्र बंद पडल्याने मृतदेह कुजून परिसरात दुर्गंधी !
|
नाशिक – येथील जिल्हा रुग्णालयातील शवागाराची वातानुकूलित यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे अनेक मृतदेह कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. (एक यंत्रणा बंद पडल्यावर तातडीने पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही ? – संपादक) गेल्या २ – ३ वर्षांपासून शवागाराची स्थिती दयनीय झाली आहे. तेथील शवपेट्याही खराब झाल्या आहेत. काही मृतदेहांना अळ्या आणि किडे लागून ते कुजलेले आहेत. काही मृतदेहांचा तर केवळ हाडांचा सापळाच राहिलेला आहे. (मृतदेहांच्या संदर्भात अक्षम्य निष्काळजीपणा करणार्या रुग्णालय प्रशासनातील संबंधितांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)