पुणे पोलीस दलातील कर्मचार्यांचा दारू पिऊन धिंगाणा !
पुणे – येथील पोलीस ठाण्यातील ३ कर्मचार्यांनी दारू पिऊन हॉटेलमध्ये गोंधळ घातला. फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार उमेश मरीस्वामी, समर्थ वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार अमित जाधव आणि चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार योगेश गायकवाड यांच्यावर या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. कुणाल बेंद्रे यांनी या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. हॉटेल बंद करण्यासाठी काम संपवत असतांनाच या तिघांनी मॅनेजरकडे दारूची मागणी केली होती; मात्र ती नाकारल्याने तिघांनी हॉटेलमालकाला धमकी देत हॉटेलमध्ये धिंगाणा घातला. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
संपादकीय भूमिकासर्वसामान्यांच्या सुरक्षेचे दायित्व असणार्या पोलिसांनी दारूच्या नशेत धिंगाणा घातला, तर जनतेच्या सुरक्षेसाठी वाली कोण ? अशा व्यसनी आणि बेजबाबदार कर्मचार्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! |