पनवेल येथे ‘वायफाय’चा ‘पासवर्ड’ न सांगणार्या अल्पवयीन मुलाची हत्या !
(वायफाय म्हणजे गतिमान इंटरनेट प्रणाली)
पनवेल – एका अल्पवयीन मुलाने त्याच्या घरातील ‘वायफाय’चा ‘पासवर्ड’ न सांगितल्याने त्याच्याच इमारतीत रहाणार्या २ तरुणांनी त्याची हत्या केली. (तरुणांमधील संवेदनशीलता संपत चालली आहे, हेच या उदाहरणावरून दिसून येते ! – संपादक) या प्रकरणी रवींद्र अटवाल उपाख्य हरियाणवी आणि संतोष वाल्मीकि यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी मुलाला शिवीगाळ करत त्याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली.
संपादकीय भूमिका
|