पुणे येथे ‘राष्ट्र निर्माण संघटने’च्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प’ सभा !
पुणे – येथील बी.एम्.सी.सी. कॉलेज, डेक्कन येथे २८ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता प्रखर राष्ट्रवादी पत्रकार श्री. सुरेश चव्हाणके यांच्या ‘राष्ट्र निर्माण संघटन महाराष्ट्र’च्या वतीने हिंदु राष्ट्राची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संकल्प’ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक एवं प्रखर राष्ट्रवादी पत्रकार श्री. सुरेश चव्हाणके, हिंदु शक्तीपीठ पालघरचे संस्थापक हिंदुभूषण श्री. श्यामजी महाराज, सामाजिक कार्यकर्ता कर्नल सुरेश पाटील, समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे, तरी हिंदूंनी अधिकाधिक संख्येने या सभेला उपस्थित राहून अमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले आहे.