आणखी ५ भूमाफियांना अटक, एकूण आरोपींची संख्या १० !
डोंबिवली येथील ६५ अवैध इमारतींचे घोटाळा प्रकरण
ठाणे, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – डोंबिवली येथील ६५ अवैध इमारत प्रकरणांशी संबंधित आणखी ५ भूमाफियांना २३ नोव्हेंबरला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाने अटक केली. मुकुंद मिलिंद दातार, सुनील बाळाराम मढवी, रजत राजन, आशू लक्ष्मण मुंगेश, राजेश रघुनाथ पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या ५ जणांच्या अटकेमुळे आता अटकेत असलेल्या आरोपींची संख्या १० इतकी झाली आहे. या भूमाफियांनी सर्वसामान्य नागरिकांना अवैध इमारतीमध्ये घर विकून फसवणूक केली आहे, तर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला आहे, तसेच अधिकोषांची कर्जाच्या माध्यमातून फसवणूक केली आहे.