हिंदूंनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे करू नये, याविषयी प्रबोधन करणारे हस्तपत्रक, भित्तीपत्रक आणि अन्य प्रसारसाहित्य उपलब्ध !
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !
हिंदूंनी पाश्चात्त्य प्रथेप्रमाणे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे न करता, हिंदु संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्यालाच नववर्ष साजरे करावे, याविषयी प्रबोधन करणारे खालील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. या प्रसारसाहित्यासाठी आवश्यकतेनुसार प्रायोजक मिळवून त्यांचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा, असे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
१. ‘ए ५’ (पाठपोट) आकारातील प्रबोधनपर हस्तपत्रक
२. ‘ए २’ आकारातील भित्तीपत्रक (याची कलाकृती समवेत दिली आहे. ती पाहून नेहमीच्या पद्धतीने उत्तरदायी साधकांना भित्तीपत्रकाची मागणी नोंदवता येईल.)
३. गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी ८ फूट x ६ फूट, १० फूट X ८ आणि १० x १२ फूट या आकारातील ‘होर्डिंग’
४. ‘ए २’ आकारातील हस्तफलक