अवैध कागदपत्रांवर स्वाक्षर्या करण्यासाठी माझ्यावर दबाव !
राज्यपाल आरिफ महंमद खान यांचा केरळ सरकारवर गंभीर आरोप
नवी देहली – केरळ सरकारच्या कामकाजामध्ये मी हस्तक्षेप करत असल्याचे माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत; परंतु मी पिनराई विजयन् सरकारला आव्हान देतो की, त्यांनी माझ्याविरोधात एकतरी पुरावा दाखवावा ज्यात मी राज्यघटनेच्या विरोधात जाऊन एक राज्यपाल म्हणून सरकारी कामांत हस्तक्षेप केला असेल. तसा पुरावा दिल्यास मी त्वरित त्यागपत्र देईन, असे वक्तव्य केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केले. ते एका इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलत होते.
#TNS2022: केरल वीसी विवाद की पूरी कहानी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान की जुबानी सुनिए@RShivshankar के सवाल, @KeralaGovernor के जवाब LIVE#TimesNowSummit2022 LIVE👉https://t.co/7S15exY5cv@Herbalifeindia @GEIndia pic.twitter.com/PUx82rYQv1
— Times Now Navbharat (@TNNavbharat) November 25, 2022
या वेळी त्यांनी केरळ सरकारवर गंभीर आरोप करतांना म्हटले की, अवैध कागदपत्रांवर स्वाक्षर्या घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. राज्यपाल खान यांनी राज्यातील विद्यापिठांच्या कुलगुरूंच्या नेमणुकीवरून सर्व ११ कुलगुरूंच्या त्यागपत्राची मागणी केल्यावरून त्यांच्याविरोधात आरोप करण्यात येत आहेत.
राज्यातील सरकारी जागांच्या नेमणुकांमध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन !
या वेळी खान म्हणाले की, केरळमध्ये सरकारी जागांवर नेमणुका करतांना सत्ताधारी मार्क्सवादी पक्षाच्या लोकांना अथवा त्यांच्या नातेवाइकांना प्राधान्य देण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाराज्यपालांनी केलेला आरोप गंभीर असल्याने केंद्र सरकारने याविषयी चौकशी करणे आवश्यक ! |