अनुमतीविना अमिताभ बच्चन यांचे नाव, तोंडवळा आणि आवाज वापरण्यास बंदी
देहली उच्च न्यायालयाचा आदेश
नवी देहली – अमिताभ बच्चन यांचा आवाज, नाव आणि तोंडवळा (चेहरा) यांच्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा वापर त्यांच्या अनुमतीविना करू नये, असा अंतरिम आदेश देहली उच्च न्यायालयाने दिला. उच्च न्यायालयाने दूरसंचार मंत्रालयासह संबंधित विभागाला अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित गोष्टी हटवण्यास सांगितले आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ नावाने चालू करण्यात आलेल्या लॉटरीत घोटाळा झाला होता. या लॉटरीच्या विज्ञापनात अमिताभ बच्चन यांच्यासारखा तोंडवळा आणि आवाज वापरण्यात आला होता. त्याविरोधात अमिताभ बच्चन यांनी देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. बच्चन यांच्याबाजूने प्रसिद्ध अधिवक्ते हरिश साळवे यांनी युक्तीवाद केला.
अमिताभ के नाम, आवाज, फोटो के इस्तेमाल पर रोक: दिल्ली हाईकोर्ट ने सरकार से कंटेंट हटाने को कहाhttps://t.co/hsa8xbj2ZK#HighCourt #AmitabhBachchan pic.twitter.com/o5GmXp3Jpr
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) November 25, 2022
उच्च न्यायालयाने म्हटले की, हे अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. त्यांच्या अनुमतीविना त्यांचा वलयांकित दर्जा वापरला जात आहे. या कृत्यांमुळे त्यांची अपकीर्ती होत आहे.