मायेतून अलिप्त होऊन कुटुंबियांसह सतत साधनारत असणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञताभावात रहाणार्‍या सौ. अंजली अजय जोशी (वय ६० वर्षे) !

सौ. अंजली अजय जोशी यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. अंजली अजय जोशी

१. सौ. प्रियांका चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ३५ वर्षे (मोठी मुलगी)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. प्रेमभाव : ‘आम्ही वडिलांच्या (पशूवैद्य अजय जोशी) स्थानांतरांमुळे अनेक ठिकाणी राहिलो. आम्ही जिथे रहायचो, त्या सर्वांशी आई चांगली जवळीक साधायची. ती तेथील परिस्थिती सहज स्वीकारून त्यांच्यात मिसळून जायची.

१ आ. जाज्वल्य धर्मप्रेम : आईला इतिहासाची पुष्कळ आवड आहे. तिनेच मला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला. ती आम्हाला लहानपणी राजांच्या शौर्यगाथा सांगायची. प्रल्हाद, ध्रुवबाळ, चिलियाबाळ, समर्थ रामदासस्वामी यांच्या गोष्टी सांगून तिनेच आमच्या मनावर भक्तीचे महत्त्व बिंबवले.

सौ. प्रियांका चेतन राजहंस

१ इ. भाव

१ इ १. आई-वडिलांच्या देवाप्रती असलेल्या भावामुळे घरातील कुलदेवीचा मुखवटा जिवंत जाणवत आहे.

१ इ २. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सनातन आश्रम यांच्याप्रती भाव : आई सेवेनिमित्त मिरज येथील सनातनच्या आश्रमात रहाते. ती कधीतरी गोव्याला घरी येते. ती गोव्याला आल्यावर ‘ती घरी येत नसून वैकुंठातच येत आहे आणि आश्रमातील भरपूर चैतन्य घेऊन पुन्हा मिरज आश्रमात अखंड सेवारत होण्यासाठी जायचे आहे’, असा ती भाव ठेवते.

१ इ ३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केल्यावर साधारण २ – ३ वर्षांनी, आईचा आणि माझा (सौ. प्रियांका) दुचाकी गाडीवरून मोठा अपघात झाला. तेव्हा दोघीही १० – १२ फूट लांब फेकल्या गेल्या होतो. आईचे नाक, चेहरा आणि डोक्याला मार लागल्याने अर्धा भाग सुजून पुढे आला होता. आता तो प्रसंग आठवल्यावर ती म्हणते, ‘‘प.पू. डॉक्टरांनी मला पुनर्जन्म दिला.’’ तिच्या मनामध्ये परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अत्यंत कृतज्ञताभाव जाणवतो.

१ ई. आई-वडिलांच्या निधनाच्या वेळी स्थिर राहून नातेवाइकांना साधना सांगणे : वर्ष २००२ मध्ये आईच्या वडिलांचे आणि वर्ष २०१७ मध्ये आईच्या आईचे निधन झाले. तेव्हाही आई स्थिर होती. तिथेही ती साधनारत होती. तिने तेथे जमलेल्या नातेवाइकांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला सांगितला. त्या वेळी सर्वांनी सामूहिक प्रार्थना आणि नामजप केला.

२. कु. मैथिली अजय जोशी (धाकटी मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ अ. मुलीला लहानपणापासून आध्यात्मिक दृष्टीकोन दिल्यामुळे मुलीची भीती न्यून होणे : ‘मला लहानपणी पुष्कळ भीती वाटायची. मी साधारण तिसरी इयत्तेत असतांना अनेक वेळा रात्री मला झोपेत ‘ज्वालामुखी आला आहे आणि मी त्यात वाहून मरत आहे’, अशी भयानक स्वप्ने पडायची. तेव्हा मी रात्री झोपेतून ओरडत घाबरून उठायचे. तेव्हा आई मला म्हणाली, ‘‘मरणाची भीती का वाटते ? मृत्यूनंतर आपण देवाकडे जातो. तुझे खरे आई-वडील देवच आहे. आम्ही नाही. मग खर्‍या आई-वडिलांकडे जायला का घाबरायचे ?’’ त्यानंतर माझी मरणाची भीती न्यून झाली. यातून तिने माझ्या मनावर ‘मी कोण आहे ? ही सर्व माया आहे’, हे लहानपणीच बिंबवले.

कु. मैथिली अजय जोशी

२ आ. देवाचा धावा करायला आणि देवावर श्रद्धा ठेवायला सांगणे : महाविद्यालयीन शिक्षण घेतांना किंवा सेवेनिमित्त कधी कधी मला रात्री घरी यायला पुष्कळ उशीर व्हायचा. त्या वेळी ती आम्हाला देवाचा धावा करायला आणि देवावर श्रद्धा ठेवायला सांगायची. त्यामुळे आम्हाला कधी भीती वाटली नाही.

अनेक कुटुंबियांमध्ये एकमेकांशी न पटणे, एकमेकांशी वाद-विवाद होणे, आई-वडिलांनी सांगितलेले मुलांनी न स्वीकारणे असे होते. आम्ही असे कधी अनुभवलेच नाही. घरात कुठलाही विषय असला, तरी सगळ्यांचे आपोआपच मत जुळते. हे सर्व गुरुकृपेने आम्हाला मिळालेल्या आई-वडिलांमुळे आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे !’

३. सौ. रेवती भट (वय ५३ वर्षे, सौ. अंजली  जोशी यांच्या लहान बहीण), नाशिक

३ अ. ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून होणारी धर्महानी रोखण्यासाठी तत्त्वनिष्ठ राहून जाणीव करून देणे : आजही ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून कोणत्या ‘पोस्ट’मधून देवतांची विटंबना होत असेल, तर ती लगेच लक्षात आणून देते. त्यातून ‘कुणी दुखावला जाईल’, असा विचार न करता ती आवर्जून जाणीव करून देते आणि त्यांना धर्महानी करण्यापासून रोखते.

सौ. रेवती भट

३ आ. कर्तेपणा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करणे : गुरुमाऊलींच्या कृपेने ताईच्या जीवनात काळजी हा भागच राहिला नाही. ती याचे संपूर्ण श्रेय सनातन संस्थेच्या माध्यमातून करायला मिळालेल्या सेवा आणि आपली गुरुमाऊली यांना देते. अनेकदा बोलता बोलता सहज सांगते, ‘‘गुरुमाऊलींची कृपा आहे गं ! जीवनात आता काळजीच उरली नाही !’’

‘सौ. अंजलीताईचे पुढील आयुष्य आनंदी, समाधानी, शांत आणि गुरुमाऊलींच्या कृपेने भारलेले असावे. आता तिच्यामध्ये जे काही स्वभावदोष राहिले असतील, ते लवकरात लवकर नष्ट होऊन गुरुमाऊलींनी तिची अध्यात्मिक उन्नती करून घ्यावी’, हीच कळकळीची प्रार्थना आणि कोटीशः कृतज्ञता !’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १०.११.२०२२)