पक्षवाद आणल्यास महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचा दावा खिळखिळा होऊ शकतो ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मुंबई – महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक काळ सत्तेत राहिले आहेत. त्या वेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुटला का ? त्यामुळे पक्षाचा वाद सीमावादात आणू नये. आपला सीमावादाचा दावा खिळखिळा होऊ शकतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे व्यक्त केले.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची भूमिका कायम आहे. आमची मागणी संविधानिक आहे. बेळगाव, कारवार आणि निपाणी यांवरील दावा आम्ही सर्वाेच्च न्यायालयात केला आहे. आमची मागणी राज्यघटनेच्या चौकटीत आहे. त्यामुळे हे वक्तव्य चिथावणीखोर होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही.’’