महाराष्ट्रप्रेमींनी राज्यपालांना विरोध करण्यासाठी पुढे यावे ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
मुंबई – राज्यपाल सातत्याने महाराष्ट्रातील आदर्शांचा अपमान करत आहेत. यापूर्वी त्यांनी सावित्रीबाईंचा अपमान केला होता. त्यामुळे राज्यपालांना राज्याबाहेर पाठवायला हवे. महाराष्ट्रप्रेमींनी राज्यपालांना विरोध करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
आता खूप झालं,महाराष्ट्रद्रोह्यांना…; उद्धव ठाकरे कडाडले https://t.co/A3IVWYzufg #ShivSena #UddhavThackeray #cmbasavrajbommai #governorbhagatsinghkoshyari #Maharashtra
— Deshdoot (@deshdoot) November 24, 2022
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘राज्यपाल नि:पक्षपाती असायला हवेत. राज्यपालपदाची झूल पांघरूण कुणी काहीही म्हटले, तर ते आम्ही मान्य करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान करण्याचा विचार राज्यपालांच्या डोक्यातील नाही. त्यामागे कोण आहे ? याचा शोध घ्यायला हवा. या प्रकरणी राज्यव्यापी आंदोलन करणे आवश्यक आहे. येत्या २-३ दिवसांत याविषयी आम्ही निर्णय घेऊ.’’