मनःशांतीसाठी चांगली नोकरी सोडून रोपवाटिकेच्या व्यवसायात तरुणाने केली यशस्वी वाटचाल !
डेहराडून (उत्तराखंड) – येथील सचिन कोठारी (वय ३३ वर्षे) यांनी चांगली नोकरी सोडून रोपवाटिकेचा व्यवसाय चालू केला. त्यात परिश्रम करून ते यशस्वी झाले. या व्यवसायातून त्यांना वर्षाला ३० लाख रुपये मिळतात. चांगली नोकरी असूनही त्यांना तेथे ताण जाणवत असे; म्हणून त्यांनी नोकरी सोडली. व्यवसायात अनेक अडचणी येऊनही त्यांनी माघार घेतली नाही. ते त्यात कार्यरत राहिले. ‘नोकरी सोडून निसर्गाच्या सान्निध्यात केलेल्या व्यवसायातून माझ्याकडे आता धन, आरोग्य आणि मनःशांती आहे. नोकरी सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता’, असे ते सांगतात.