कल्याण, वसई आणि वाशी येथे एकाच दिवशी ४०३ वीजचोरांवर कारवाई !
मुंबई – महावितरणच्या कल्याण, वाशी आणि वसई मंडळात ४०३ चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. १ सहस्र ७०० कर्मचार्यांच्या २३६ विशेष पथकांनी १३ सहस्र ७९८ वीजमीटरची पडताळणी केली. वीजचोरीला प्रतिबंध आणि ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार अचूक वीजदेयक देणे, या उद्देशाने पोलीस अन् सुरक्षारक्षक यांच्या साहाय्याने ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत महिला कर्मचार्यांचा सहभाग लक्षणीय होता. ‘वीजचोरीच्या गुन्ह्यात कठोर शिक्षा आणि दंड यांची तरतूद असून कोणतीही युक्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करू नये; अन्यथा कारवाई अटळ आहे’, अशी चेतावणी महावितरणने दिली आहे.
संपादकीय भूमिकावीजचोरांना कोणती कठोर शिक्षा देण्यात येणार आहे, हेही सांगितल्यास वीजचोरीला आळा बसेल ! |