पांढरकवडा (जिल्हा यवतमाळ) येथे ‘हलाल जिहाद’ विषयी व्यापार्यांना मार्गदर्शन !
पांढरकवडा (यवतमाळ), २४ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील अग्रसेन भवन येथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती संकल्पमासाच्या अंतर्गत व्यापार्यांना २० नोव्हेंबर या दिवशी ‘हलाल जिहाद’विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यवतमाळ जिल्हा समिती समन्वयक श्री. प्रफुल्ल टोंगे यांनी मार्गदर्शन करतांना व्यापार्यांच्या शंकांचे निरसन केले. येथील व्यावसायिक सर्वश्री गोपाल बाजोरीया, सतीश सिंघानिया, विजय चौधरी आणि डॉ. किरण मायी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष साहाय्य केले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.