मुसलमान तरुणाशी विवाह करणार्या हिंदु तरुणीवर गोळीबार
मुसलमान तरुणाच्या भावावर संशय !
जयपूर (राजस्थान) – येथे अंजली नावाच्या हिंदु तरुणीला गोळ्या घालण्यात आल्या. ही घटना मुरलीपुरा भागात घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने हा गोळीबार केला. घायाळ झालेल्या अंजली यांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांची स्थिती गंभीर आहे.
Rajasthan: Anjali shot by husband Abdul Lateef’s brother over interfaith marriage in Murlipura https://t.co/tyuqCSg9kq
— OpIndia.com (@OpIndia_com) November 24, 2022
अंजली हिने अब्दुल लतीफ याच्याशी विवाह केला होता. अंजली लतिफवर प्रेम करत होती. लतिफ याचा पहिला विवाह झाला होता; मात्र त्याचा घटस्फोट झाला होता. लतिफचे कुटुंब अंजलीला सोडण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत होते. अंजलीवर गोळीबार करण्यात लतिफ याचा मोठा भाऊ अझीज आणि त्याच्या मित्र यांचा हात असल्याचे लतिफ याने सांगितले.
संपादकीय भूमिकाहिंदु तरुणीने मुसलमान तरुणाशी विवाह करणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत प्रवेश करण्यासारखे आहे, हे हिंदु तरुणींना समजेल तो सुदिन ! |