तालिबानकडून निर्दोष महिलांवर बलपूर्वक इस्लाम लादण्याचा प्रयत्न ! – गीर्ट विल्डर्स
अॅम्स्टरडॅम (नेदरलँड्स) – येथील ‘पार्टी ऑफ फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांकडून एका महिलेला चाबकाचे फटके देण्यात असलेला व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करून त्यावर, ‘अमानुष तालिबान महंमद पैगंबर यांच्या नावाखाली निर्दोष महिलांवर अमानुष इस्लाम लागू करत आहे’, असे लिहिले होते. यानंतर विल्डर्स यांना धर्मांध मुसलमानांकडून ठार मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.
पाकिस्तानच्या फैसलाबाद येथील रहाणार्या सय्यद रिझविया याने धमकी देतांना म्हटले की, आता तुला वाचण्याचे कोणतेच मार्ग शिल्लक राहिलेले नाहीत. तुझा शिरच्छेद केला जाईल. तू आमच्या महंमद पैगंबरांविषयी अयोग्य बोलत आहेत. आम्ही तुला नरकात पाठवू.