‘कॉन्व्हेंट’ शाळा, तसेच चर्चप्रणीत अनाथालयांमध्ये होणार्या लैंगिक अत्याचार प्रकरणांची चौकशी करा ! – हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे शासनाकडे मागणी
पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) – नवी मुंबई आणि पुणे येथील ‘कॉन्व्हेंट’ शाळा, तसेच चर्चप्रणीत अनाथालयात अल्पवयीन मुला-मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना शिक्षणक्षेत्राला कलंकित करणार्या तर आहेतच, तसेच ‘पॉक्सो’, तसेच ‘बाल हक्क संरक्षण कायदा २००५’ नुसार दंडनीय आणि अजामीनपात्र गुन्ह्यात मोडणार्या आहेत. राज्यातील सर्व कॉन्व्हेंट शाळा आणि चर्चप्रणीत अनाथालये यांमध्ये अत्याचार करून मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त तर केले जात नाही ना ? हे पडताळण्यासाठी पत्रकार, समाजसेवक, पोलीस, महिला, निवृत्त न्यायाधीश आणि शासकीय अधिकारी यांचे ‘विशेष अन्वेषण पथक’ नेमून अन्वेषण करावे, अशी मागणी नुकत्याच झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’द्वारे करण्यात आली.
या आंदोलनात भाजपचे श्री. राजेंद्र जाधव आणि श्री. प्रकाश पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. धनंजय गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधाकर पिसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. विजय गुरव, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. मोहन माळी, बजरंग दलाचे श्री. किरण पुरोहित, भाजप युवामोर्चा सरचिटणीस श्री. राजेंद्र बुरुड, धर्मप्रेमी श्री. मोहन पाटील आणि श्री. अनिकेत पाटील यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. आंदोलनानंतर पेठवडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांना निवेदन देण्यात आले.