भरतनाट्यम् नृत्यातील अडवू करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. अडवू
‘भरतनाट्यम् नृत्यातील पदन्यास (पायांच्या हालचाली), हातांच्या हालचाली आणि नृत्यहस्त (हाताने केल्या जाणार्या विविध मुद्रा) यांच्या एकत्रितपणे केलेल्या प्राथमिक लयबद्ध हालचालींच्या समूहाला ‘अडवू’ असे म्हणतात. भरतनाट्यम् नृत्याचा प्रारंभ अडवू करून केला जातो. तमिळ परंपरेनुसार १२० अडवू आहेत. वेगवेगळ्या संप्रदायांनुसार शिकवल्या जाणार्या अडवूंची संख्या अल्प-अधिक आहे. प्रमुख १३ आणि त्याचे उप अडवू असे एकूण १२० किंवा त्यापेक्षा अल्प-अधिक असे अडवूंचे प्रकार असतात.
२. अडवू करतांना त्यांच्याशी संबंधित दिसलेले रंग आणि ते करतांना आलेल्या अनुभूती
डिसेंबर २०२१ मध्ये मी काही अडवू केले. त्या वेळी मला अडवूंशी संबंधित दिसलेले रंग आणि अडवू करतांना आलेल्या अनुभूती यांविषयीची माहिती सारणी रूपात दिली आहे.
टीप : काही नृत्य शाळांमध्ये अडवूंचे बोल वरील बोलांपेक्षा निराळेही शिकवले जातात, उदा. ‘तिरमाणम्’ या अडवूचे बोल काही ठिकाणी ‘धित्-धित्-तै’, तर काही ठिकणी ‘गि-ण-तोम्’ असेही शिकवले जातात. साधिका हे अडवू जसे शिकली आहे, त्यानुसार ते करून तिने वरील अनुभूती घेतली आहे.
– कु. म्रिणालिनी देवघरे, भरतनाट्यम् विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.२.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |