मुंबई येथे महापालिकेचा अधिकारी असल्याचे सांगत चोरीचा प्रयत्न करणार्याला अटक !
कायदा-सुव्यवस्थेचा धाकच नसल्याचे हे लक्षण !
मुंबई – महापालिकेचा अधिकारी असल्याचे सांगत घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न करणार्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय बाबू धोत्रे असे आरोपीचे नाव असून अंधेरी येथे ही घटना घडली. लोखंडवाला येथील मंजू जैन यांच्या घरात नूतनीकरणाचे काम चालू होते. अक्षय धोत्रे याने मुंबई महापालिकेकडून आल्याचे सांगून घरात प्रवेश केला. नूतनीकरणाचे काम अवैध असल्याचे सांगून कारवाई टाळण्यासाठी १० सहस्र रुपयांची मागणी केली; मात्र मंजू जैन यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने जैन यांची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला; परंतु कामगार पुढे आल्यामुळे धोत्रे पळून गेला. तक्रारीनंतर धोत्रे याला अटक करण्यात आली.