माहीम (मुंबई) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत उपस्थित हिंदूंची धर्मकार्यात सहभागी होण्याची सिद्धता !
मुंबई, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच माहीम, मच्छिमारनगर येथील श्रीराम मंदिरात हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली. या एकवक्ता सभेला पुष्कळ राष्ट्र आणि धर्म प्रेमी उपस्थित होते. सभा संपल्यानंतर ३९ धर्मप्रेमींनी समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांच्याशी अनौपचारिक संवाद साधून धर्मकार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली. या ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षणवर्ग चालू करण्याची मागणी हिंदु धर्मप्रेमींनी केली आहे.
या सभेला श्री. सतीश कोचरेकर यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करतांना ‘लव्ह जिहाद’मुळे हिंदु कुटुंबसंस्था आणि ‘हलाल जिहाद’मुळे हिंदूंची आर्थिक स्थिती उद्ध्वस्त होत आहे. आफताब याने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्या श्रद्धा वालकर या हिंदु तरुणीची हत्या केली. ‘सेक्युलर’ मानसिकतेचे बुद्धीवादी एरव्ही हिंदु धर्म, चालीरिती यांवर पुढारलेपणाच्या नावाखाली टीका करतात आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’, ‘लव्ह जिहाद’ यांसारख्या अनैतिक अन् जिहादी प्रकारांचे समर्थन करतात; मात्र या जिहादी षड्यंत्रामध्ये हिंदु तरुणींच्या होत असलेल्या हत्यांविरोधात चकार शब्द बोलत नाहीत. हीच धर्मनिरपेक्षता आहे का ? हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात धर्मशिक्षण घेऊन हिंदूंनी संघटित व्हावे.’’