लँड जिहादला प्रोत्साहन देणारा कायदा रहित होण्यासाठी हिंदूंनी लढा द्यायला हवा ! – नरेंद्र सुर्वे, देहली राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
एकीकडे हिंदूंची मोठी मंदिरे आणि संपत्ती सरकारने स्वत:कडे घेतली आहे, तर दुसरीकडे मुसलमानांच्या धार्मिक स्थळ वा संपत्ती यांना हात लावण्याऐवजी त्यांना संरक्षित करण्यासाठी वक्फ बोर्ड कायदा केला आहे. हा हिंदूबरोबर केलेला छळकपट आहे. लँड जिहादसाठी अर्थात् भूमी हडपण्यासाठी कायद्याद्वारे एक समांतर व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. हा कायदा म्हणजे एक प्रकारे मुसलमानांना दिलेले हत्यार आहे. लँड जिहादसाठी प्रोत्साहन देणारा हा कायदा रद्द करण्यासाठी हिंदूंनी लढा दिला पाहिजे.