झाडांचे नियमित निरीक्षण करावे !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘झाडांचे नियमितपणे निरीक्षण करणे’, हा लागवड करणार्यासाठी आवश्यक गुण आहे. बी पेरल्यानंतर कोणते बी किती दिवसांनी उगवते ? कुठल्या झाडाला किती पाणी लागते ? अशा अनेक गोष्टी निरीक्षणानेच समजतात. विविध प्रकारच्या किडी पानांच्या मागील बाजूस अंडी घालतात. त्यामुळे कीड लागलेली चटकन लक्षात येत नाही; परंतु किडींनी अंडी घातल्यावर त्यांच्यावर असलेला विशिष्ट चिकट पदार्थ खाण्यासाठी झाडावर मुंग्या येतात. त्यामुळे मुंग्यांचा वावर झाडावर दिसताच पानांची मागील बाजू बघून तेथे अंडी घातलेली असतील, तर लगेचच उपाययोजना करणे शक्य होते. अशा प्रकारे केवळ नियमित निरीक्षण करण्याने झाडांविषयीचे अनेक बारकावे आपोआप लक्षात येऊ लागतात.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (९.११.२०२२)