ख्रिस्ती मिशनर्यांचे धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक ! – कुरु थाई, उपाध्यक्ष, बालसंसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश
अरुणाचल प्रदेशमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नुकतेच परशुराम कुंडाच्या ठिकाणी भगवान परशुरामाच्या मूर्तीचे उद्घाटन करण्यात आले. याचसमवेत अरुणाचल प्रदेशात पहिल्यांदाच होणार्या विमानतळाला राज्य सरकारने स्थानिक नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक वृत्तपत्रांमध्ये ‘अरुणाचल प्रदेशचे भगवेकरण होत आहे’, असा कांगावा करण्यात आला.
अरुणाचल प्रदेशमध्ये ‘परशुराम कुंड’, पुरातन संस्कृती, परंपरा, धार्मिक स्थळे ही काय भाजपने आणली का ? अरुणाचल प्रदेशमध्ये एकदा ख्रिस्ती धर्म न स्विकारल्याने महिलेले जिवंत जाळण्याची घटना घडली, तसेच एका मंत्र्याने ख्रिस्त्यांच्या एका मोठ्या उपक्रमाचे उद्घाटन केले, अशा काही घटना घडल्या. त्या वेळी अरुणाचल प्रदेशमधील वृत्तपत्रांमध्ये ‘विदेशी वसाहतवादाचा अरुणाचलमध्ये प्रचार’ असे छापण्यात का आले नाही ? अरुणाचल प्रदेशमधील काही वृत्तपत्रे ख्रिस्ती मिशनरी आणि काही राजकीय पक्ष यांचे मुखपत्र बनली आहेत. हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी त्यांचे षड्यंत्र आहे, तसेच ख्रिस्ती मिशनर्यांकडून धर्मांतराचेही प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहेत, ते हाणून पाडले पाहिजेत.