हिंदु तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार करणार्या नजीबुद्दीनला अटक
चेन्नई – येथे १८ वर्षांच्या एका हिंदु तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी नजीबुद्दीन या नराधमाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. तो त्याचे राजू मणी नायर असे नाव असल्याचे खोटे सांगत होता. मृत तरुणीची आई ही नजीबुद्दीन याच्यासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) रहाते. या घटनेनंतर नजीबुद्दीन मुंबईतील विरार येथे लपून बसला होता.
या प्रकरणी मृत मुलीच्या आईने केलेल्या पोलीस तक्रारीत म्हटले आहे, ‘‘घटनेच्या वेळी मी बाहेर गेले होते. मी घरी परत आले, तेव्हा मला माझी मुलगी मृतावस्थेत पडलेली दिसली. तिच्या मानेवर जखमा होत्या. त्यानंतर घराची झडती घेतली असता, मुलीचे दागिने आणि रोख २० सहस्र रुपये पळवल्याचे मला आढळून आले.’’
Chennai: Police arrest Najibuddin over sexual assault and murder of his lover’s 18-year-old daughter; media outlets choose to refer to him by his alias ‘Raju’ https://t.co/I3MNSZbKxH
— OpIndia.com (@OpIndia_com) November 22, 2022
पीडित महिला गेल्या ५ वर्षांपासून पतीपासून वेगळी रहात होती. तिला २ मुले आहेत, जे पतीसमवेत रहातात. काही दिवसांपूर्वी पीडित महिलेची नजीबुद्दीन याच्याशी ओळख झाली. त्याने पीडितेची आणि तिच्या मुलीची काळजी घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्या दोघी त्याच्याकडे रहायला गेल्या. १५ दिवसांपूर्वी त्याने मुलीचा झोपेत असतांना विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पीडितेचे नजीबुद्दीनशी भांडणही झाले. नजीबुद्दीन आधीच विवाहित होता.
संपादकीय भूमिका
|