टिपू सुलतान याच्यावरील कन्नड भाषेतील पुस्तकाच्या विक्रीवर न्यायालयाकडून बंदी
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील अतिरिक्त नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने जिल्हा वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष बी.एस्. रफीउल्ला यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना टिपू सुलतान याच्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकाच्या कोणत्याही माध्यमातून होणार्या विक्रीवर आणि वितरणावर बंदी घातली आहे. अडांडा करियप्पा यांनी कन्नड भाषेत ‘टिपू निजा कनसुगालु’ (टिपूची खरे स्वप्ने) नावाचे पुस्तक लिहिले आहे आणि त्याचे प्रकाशन ‘अयोध्या प्रकाशन’ने कले असून मुद्रक राष्ट्रोत्थान मुद्राणालय आहे.
Karnataka court stays distribution, sale of book on Tipu Sultan https://t.co/xUBS1N3yz3
— Republic (@republic) November 23, 2022
रफीउल्ला यांनी त्यांच्या याचिकेत दावा केला आहे की, या पुस्तकात देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. या पुस्तकात मुसलमानांसाठी अपमानजनक शब्दाचा वापर करण्यात आला आहे. यातून समाजात अशांतता आणि वैमन्सय पसरण्याची शक्यता आहे.