जर हिंदु धर्मीय एक विवाह करतात, तर अन्य धर्मियांनीही एक विवाह केला पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
कर्णावती (गुजरात) – तुम्ही २-३ विवाह का म्हणून करत आहात ? जर हिंदु एक विवाह करतो, तर अन्य धर्मियांनाही एकच विवाह करावा लागेल. देशात समान नागरी कायदा झाला पाहिजे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते हिमंत बिस्व सरमा यांनी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत केले. भाजपने गुजरातमध्ये समान नागरी कायदा बनवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.
एक व्यक्ति देश में 2-3 शादी कर लेता है, आप क्यों करेंगे इतनी शादी। देश में अगर हिंदू 1 शादी करता है तो बाकि धर्म के लोगों को भी 1 ही शादी करनी पड़ेगी। इसलिए मैं आज ये बोलता हूं कि देश को समान नागरिक संहिता कानून चाहिए: असम के मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा, धनसूरा, गुजरात pic.twitter.com/HaBwSk1fAS
— ANI_HindiNews (@AHindinews) November 22, 2022
लव्ह जिहादविरोधी कायदा झाला पाहिजे !
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, देहलीमध्ये आफताब नावाच्या मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीची हत्या करून तिचे ३५ तुकडे केले. त्याने या तरुणीशी विवाह करण्याचे आश्वासन देऊन असे केले. तो अन्य तरुणींशीही मैत्री करत होता. देशात अनेक आफताब असल्याने लव्ह जिहादविरोधी कायदा केला पाहिजे.
#WATCH | Gujarat: Aftaab killed Shardha & chopped her body into 35 pieces. When police asked why he brought only Hindu girls he said he did it because they’re emotional.There’re other Aftaab-Shradha too,country needs strict law against ‘Love Jihaad’: Assam CM HB Sarma in Dhansura pic.twitter.com/5PEc7HsvVh
— ANI (@ANI) November 22, 2022