व्हर्जिनिया (अमेरिका) येथील वॉलमार्ट दुकानामध्ये झालेल्या गोळीबारात १० जण ठार
व्हर्जिनिया (अमेरिका) – येथील वॉलमार्ट दुकानामध्ये २२ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या गोळीबारात १० जण ठार झाल्याचे वृत्त आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्टोअरच्या व्यवस्थापकाने त्यांच्या कर्मचार्यांवर गोळ्या झाडायला चालू केले आणि नंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली. आठवडाभरात गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. याआधी कोलोरॅडोमधील क्लबमध्ये गोळीबार झाला होता. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता.
USA: At least 10 people die in mass shooting in a Walmart store in Virginia, shooter found deadhttps://t.co/PzVo83MWTT
— OpIndia.com (@OpIndia_com) November 23, 2022
पोलिसांनी सांगितले की, आम्हाला रात्री १० वाजता गोळीबाराची माहिती मिळाली. आम्ही तातडीने घटनास्थळी पोचलो. अनेक लोकांचा मृत्यू झाला होता, लोक घायाळ झाले होते. मृतांचा आकडा आम्ही सध्या सांगू शकत नाही. अन्वेषणानंतरच काहीतरी समोर येईल. घायाळांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|