अंथरूणावर दिले जात आहे जेवण !
सत्येंद्र जैन यांचा कारागृहातील आणखी एक व्हिडिओ !
नवी देहली – देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा तिहार कारागृहातील एक व्हिडिओ भाजपकडून प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जैन यांना अंथरूणावर जेवण आणून देण्यात येत आहे आणि ते भोजन करत आहेत, असे दिसत आहे. यापूर्वी जैन यांचा कारागृहात त्यांचे मालीश केले जात असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. आर्थिक अपहाराच्या प्रकरणी जैन अटकेत आहेत.
One more video from media! After taking maalish from rapist & calling him PHYSIO therapist, Satyendra Jain can be seen enjoying sumptuous meal! Attendants serve him food as if he is in a resort on vacation!
Kejriwal ji ensured that Hawalabaaz gets VVIP maza not saza! pic.twitter.com/IaXzgJsJnL
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) November 23, 2022
भाजपने हा व्हिडिओ प्रसारित करून म्हटले आहे की, सत्येंद्र जैन यांना कारागृहामध्ये स्वादिष्ट जेवण दिले जात आहे. केजरीवाल यांनी व्हीआयपींच्या मनोरंजनाची कारागृहामध्ये चांगलीच व्यवस्था केली आहे. मंत्री जैन हे कारागृहात नसून जसे काही रिसॉर्टमध्ये बसून जेवणाचा आनंद घेत असल्याचे वाटत आहे.
संपादकीय भूमिकाकारागृहात बंदीवान असणार्या मंत्र्याला विशेष वागणूक देणार्या पोलीस प्रशासनातील संबंधित भ्रष्ट अधिकार्यांवर कारवाई करा ! |