धर्माच्या आधारावर हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावर महिला सुरक्षित रहातील ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, सनातन संस्था
पारशी बांधवांचा पर्शिया देश इराण झाला. याच इराणमधील मुसलमान महिलांनी हिजाबला कडाडून विरोध केला आहे. काही तथाकथित उदारमतवादी षड्यंत्राद्वारे हिजाबला पाठिंबा देत आहेत. नारीशक्ती एकत्रित आली, तर काय होऊ शकते, हे जगभरातील महिलांकडून हिजाबला होत असलेल्या विरोधातून लक्षात येत आहे. इराणसारख्या अनेक इस्लामी देशांत तेथील जाचक कायद्यांमुळे मुसलमान महिलांवरच अत्याचार होत आहेत, ज्याला आता विरोध होत आहे. ‘हिंदु धर्म महिलांना देवीसमान मानतो’, या धर्माच्या आधारावर हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावर महिला अवश्य सुरक्षित रहातील.