दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मुख्यालयात तडकाफडकी स्थानांतर
दौंड (जिल्हा पुणे) – दौंड शहरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणार्या महिला आणि तरुण यांच्यावर प्राणघातक आक्रमण प्रकरणाची अन् त्यातील संशयित आरोपींना अटक न करण्यामागील पोलिसांच्या भूमिकेची सीआयडीकडून चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली होती. या घटनेची दखल घेत दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मुख्यालयात तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वरील स्थानांतर केले आहे.