कोंढव्यातील (पुणे) अवैधपणे गोमांस विकणार्या दुकानांवर कारवाई करून गोहत्या बंद कराव्यात ! – गोरक्षकांचे पोलिसांना निवेदन
म्हशीच्या मांसाच्या दुकानात सर्रासपणे गोमांसाची विक्री
पुणे – कोंढव्यात गेल्या २ मासांपासून गोमांस विक्रीचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. फलटण, बारामती, इंदापूर, भिगवण, दौंड या ग्रामीण भागांत गायी आणि बैल यांची कत्तल केली जाते आणि पुण्यातील कोंढवा सारख्या मुसलमानबहुल भागांतील दुकानांत गोमांस मोठ्या प्रमाणात पाठवले जात आहे, तसेच गोरक्षकांना मारहाण करण्यासाठी वाहनचालक धारदार शस्त्रांचा वापर करत आहेत. त्यामुळे गोरक्षकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. येथील दुकानात गाय आणि बैल यांचे मांस अनधिकृतपणे विकले जात आहे. त्यात गोमांस विक्रेता स्वच्छतेची काळजी घेत नाही. म्हशीचे मांस विक्रीला महाराष्ट्र सरकारने अनुमती दिली आहे; पण सर्रासपणे म्हशीच्या मांसाच्या दुकानात, ज्याची विक्री किंवा कापण्याची अनुमती नाही, असे गोमांस विकले जात आहे. हिंदूंसाठी गाय पूजनीय आहे, त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. कोंढव्यात दुकानदार गोहत्या करून गोमांस विक्री करत आहेत, तरी आपण कोंढव्यातील अवैधपणे गोमांस विकणार्या दुकानांवर कारवाई करून गोहत्या बंद कराव्यात, असे निवेदन गोरक्षकांच्या वतीने कोंढवा पोलिसांना देण्यात आले.
या वेळी राहुल कदम, ऋषिकेश कामथे, अक्षय कांचन, ओम मोहोळ आदी गोरक्षक उपस्थित होते. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, तसेच पुण्याचे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
१. कोंढव्यातील कौसरबाग मशीद आणि कडेनगर परिसरात गेल्या काही दिवसांत पोलिसांनी कारवाई करत अनुमाने ५० गोवंशियांना वाचवले आहे, तसेच गेल्या काही दिवसांपासून कोंढवा परिसरातील लुलानगर, मिठानगर आणि अश्रफनगर परिसरातील गोमांसाच्या दुकानांची संख्या वाढली असून प्राणी संरक्षण कायद्याची कार्यवाही होत नाही.
२. गोरक्षकांना माशल्लाह बीफ, बीफ शॉप, हमीम नवाब बीफ, हाजी अली, गरीब नवाब बीफ, झानिद बीफ, हबीब नवाब बीफ, हैदर अली बीफ, माली जनात बीफ, दिवाना बीफ शॉप या दुकानांत गोमांस विक्री होत असल्याचे आढळून आले आहे.
संपादकीय भूमिकागोरक्षकांना अशी निवेदने का द्यावी लागतात ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? कि त्यांची इच्छा नाही. |