मुंबईमध्ये गोवरमुळे १० जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या २०८ !
मुंबई – शहरात गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये गोवरमुळे १० जणांचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या २०८ वर पोचली आहे.
२१ नोव्हेंबर या दिवशी मुंबईमध्ये गोवरचे आणखी २४ नवीन रुग्ण आढळले, तर २२ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. मुंबईमध्ये गोवंडी, कुर्ला, अंधेरी, प्रभादेवी, गोरेगाव, कांदिवली, भायखळा, माटुंगा, भांडुप, चेंबूर येथे गोवरचे रुग्ण आढळले आहेत. साथ रोखण्यासाठी आतापर्यंत मुंबईतील १६ सहस्रांहून अधिक बालकांना गोवरचा डोस देण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून बालकांचे लसीकरण येत्या १० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रतिकारक्षमता न्यून असल्यामुळे वृद्ध व्यक्तींनाही गोवर होण्याची शक्यता आहे; मात्र सध्या वृद्धांना लस देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
Govar Vaccination | गोवरच्या साथीबाबत केंद्रीय आरोग्य यंत्रणा अॅक्शन मोडवर; लसीकरणाबाबत मोठा निर्णय https://t.co/vpgJVxYymd#Govar #CentralHealthMinstry #BharatiPawar #Mumbai #zee24taas #MarathiNews
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 22, 2022