दाऊदकडून पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचणे चालू असल्याचा अज्ञाताकडून मुंबई पोलिसांना संदेश !
मुंबई – कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम त्याच्या हस्तकांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा संदेश अज्ञाताकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या भ्रमणभाषवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलिसांकडून चौकशी चालू करण्यात आली आहे.
सौजन्य : दैनिक जागरण
२० नोव्हेंबर या दिवशी वाहतूक नियंत्रण क्रमांकावर ७ ऑडिओ क्लिप आणि काही संदेश आले. त्यानंतर २१ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा १२ ऑडिओ आणि काही संदेश आले. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने ‘कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत आहेत. हे हस्तक देशाला नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत’, असे म्हटले आहे. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणामध्ये संदेश पाठवणारा अज्ञात पूर्वी एका हिर्यांच्या आस्थापनात दागिने बनवत होता; परंतु मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. सध्या वर्षभरापासून तो बेरोजगार आहे. असे असले, तरी या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.