(म्हणे) ‘जे केले ते रागाच्या भरात केले !’
|
नवी देहली – मी जे काही केले ते रागाच्या भरात केले. या प्रकरणात अन्वेषणासाठी सहकार्य करत आहे आणि पुढेही करत राहीन, अशी स्वीकृती प्रेयसी श्रद्धा वालकर हिची हत्या करणारा तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने येथील साकेत न्यायालयात दिली. आफताब याला साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित करण्यात आले होते. सुनावणीच्या वेळी पोलिसांनी आफताबच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. पोलिसांच्या मागणीवरुन न्यायालयाने आफताबच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ केली.
सौजन्य : दैनिक जागरण
पोलीस चौकशीमध्ये त्याने नकाशा बनवून श्रद्धाचे अवयव कुठे फेकले होते ते सांगितले. त्याने श्रद्धाची कवटी एका तलावाजवळ फेकून दिली होती. बरेच मास उलटून गेल्यामुळे त्याला नेमके ठिकाण आठवत नाही, असेही त्याने पोलिसांना सांगितले.
संपादकीय भूमिका
|