‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने प्रसार करतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. श्री. आनंद नाईक, कुडाळ
१ अ. ‘साक्षात् श्रीकृष्णच हात धरून प्रसार करून घेत आहे’, असे जाणवून आनंद होणे : ‘श्रीकृष्णाच्या कृपेने ६.२.२०२१ या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारसेवेतून मला पुष्कळ चैतन्य अनुभवता आले. प्रसाराची सेवा करत असतांना जिज्ञासूंमधील उत्साह आणि आनंद अनुभवता आला. या सेवेमुळे ‘साक्षात् श्रीकृष्णच माझा हात धरून माझ्याकडून प्रसार करून घेत आहे’, असा भाव अनुभवायला मिळून आनंद मिळाला.’
२. कु. पूजा धुरी, कुडाळ
२ अ. प्रथमच भेटणार्या धर्मप्रेमी व्यक्तीने आपुलकीने बोलल्यावर भावजागृती होणे : ‘गावामध्ये प्रसार करतांना आम्ही एका धर्मप्रेमींच्या घरी गेलो होतो. त्यांनी आमचे आदराने स्वागत केले. सभेचा विषय ऐकल्यानंतर ते म्हणाले, ‘‘मी माझ्या संपर्कातील सर्वांना याविषयी सांगतो.’’ आमचे बोलणे चालू असतांना ते मला म्हणाले, ‘‘ताई, तू कधीही आमच्या घरी येऊ शकतेस. हे तुझेच घर आहे.’’ त्यांच्या या बोलण्याने माझी पुष्कळ भावजागृती झाली.
२ आ. ‘हिंदु जनजागृती समिती’विषयी समाजमनात असलेला आदर ! : एका धर्मप्रेमी महिलेला सभेचे निमंत्रण दिल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तुमच्यासारख्यांचे पाय आमच्या घराला लागणे’, हे आमचे भाग्यच आहे. आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.’’ यातून समाजात ‘हिंदु जनजागृती समिती’विषयी पुष्कळ आदरभाव आहे’, हे माझ्या लक्षात आले.’
३. श्री. मिलिंद पारकर, कणकवली
३ अ. स्थानिक ‘केबल’ वाहिनीचालकांनी सभेच्या थेट प्रक्षेपणासाठी आरंभी ‘विशिष्ट शुल्क भरावे लागेल’, असे सांगणे आणि सभा चालू होण्यापूर्वी अर्धा घंटा त्यांनी ‘सभेचे थेट प्रक्षेपण विनामूल्य करत आहोत’, असा निरोप देणे : ‘स्थानिक ‘केबल’ वाहिनीवर हिंदु राष्ट्र-जागृती सभेला प्रसिद्धी मिळावी’, यासाठी आमचे प्रयत्न चालू होते. आम्ही एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला संपर्क केला होता. त्याने ‘प्रक्षेपणासाठी शुल्क भरावे लागेल’, असे आम्हाला सांगितले होते. संपूर्ण जिल्ह्यात या वाहिनीच्या सुमारे ६० सहस्र जोडण्या आहेत. ग्रामीण भागात भ्रमणभाषचे ‘नेटवर्क’ नसलेल्या ठिकाणी ‘केबल’च्या माध्यमातून प्रक्षेपण झाल्यास अनेक धर्मप्रेमींना सभा पहाता येणार होती. सभा चालू होण्यापूर्वी अर्धा घंटा मी त्या प्रतिनिधीला पुन्हा संपर्क करून विचारले. तेव्हा त्यांनी ‘‘आम्ही तुमच्या सभेचे थेट प्रक्षेपण विनामूल्य करत आहोत’’, असे सांगितले. सभेच्या प्रसारणाला मिळालेली ही प्रसिद्धी, म्हणजे श्रीकृष्णाच्या कृपेची मोठी अनुभूतीच होती.’
४. श्री. वासुदेव सडवेलकर, कुडाळ
४ अ. सभेपूर्वी डोळे बंद केल्यावर श्रीकृष्णाचे दर्शन होणे : ‘ही सभा चैतन्यमय वाटत होती. सभा चालू होतांना मी थोडा वेळ डोळे मिटले. त्या वेळी मला श्रीकृष्णाचे दर्शन झाले. सभेच्या शेवटी उभे राहून शपथ घेतांना माझ्या संपूर्ण शरिरावर रोमांच उभे राहिले.’
‘सनातन प्रभात’च्या एका जागृत वाचिकेने ‘विज्ञापनांचा समाजमनावर होणारा अनिष्ट परिणाम’, यांविषयी सांगितलेला तिचा अनुभव१. ‘ओटीभरण’ कार्यक्रमात दूरचित्रवाहिनीवरील एका विज्ञापनात दाखवल्याप्रमाणे मुलीला मुसलमान महिलेसारखे सजवणे : ‘काही दिवसांपूर्वी ‘सनातन प्रभात’च्या एका वाचिकेच्या मुलीचा सासरी ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. काही कामामुळे मुलीच्या सासरी कार्यक्रमाला त्या थोड्या उशिरा पोचल्या. मुलीच्या घरी गेल्यावर मुलीला पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या; कारण तिला दूरचित्रवाहिनीवरील एका विज्ञापनात दाखवल्याप्रमाणे पूर्णतः मुसलमान महिलेसारखे सजवले होते. तिला काळा बुरखा घातला होता. तिच्या हातात बांगड्या नव्हत्या आणि कपाळावर टिकलीही नव्हती. ती विचित्रच दिसत होती. २. वाचिकेने कुणाच्या विरोधाला न जुमानता मुलीला हिंदु संस्कृतीनुसार नटवून नंतर ‘ओटीभरण’ कार्यक्रम चालू करणे : कार्यक्रम चालू होण्यापूर्वी वाचिकेने आपल्या मुलीला आतील खोलीत नेले. त्या वेळी मुलीच्या सासरच्यांनी वाचिकेला विरोध केला. तरीही त्यांनी मुलीला हिंदु संस्कृतीनुसार सजवले आणि त्यानंतरच कार्यक्रम चालू केला. वाचिकेने हा प्रसंग मला सांगितल्यावर मी तिचे कौतुक केले. मध्यंतरी दागिन्यांचा (ज्वेलरीचा) व्यवसाय करणार्या एका आस्थापनाचे दूरचित्रवाहिनीवर असे एक विज्ञापन प्रसारित झाले होते. ‘या विज्ञापनाचा समाजमनावर किती वाईट परिणाम झाला आहे. याविषयी ‘प्रत्येक हिंदूमध्ये जागृती होणे आवश्यक आहे’, हेच यातून माझ्या लक्षात आले.’ – कु. पूजा धुरी, कुडाळ, सिंधुदुर्ग. (६.३.२०२१) |
(सर्व सूत्रांचा दिनांक ६.३.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |