पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साधकांनी त्यांच्यावर केलेल्या कविता
२१.११.२०२२ या दिवशी पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त साधकांनी त्यांच्यावर केलेल्या कविता पुढे दिल्या आहेत.
पू. अश्विनीताईंच्या रूपात आईची कृपा आहे आमच्यावरी ।
‘परम पूज्य गुरुदेवांची कृपा आहे आमच्यावरी ।
पू. अश्विनीताईंच्या रूपात आईची कृपा आहे आमच्यावरी ।। १ ।।
नाही सांगितली जरी मी माझ्या मनाची स्थिती ।
ओळखूनी मज, प्रयत्नांची योग्य दिशा त्या देती ।। २ ।।
जाणवत होता आरंभी मला एकटेपणा ।
त्यांच्या प्रेमळ दृष्टीने आणि स्पर्शाने निघून गेला दुरावा ।। ३ ।।
‘पू. अश्विनीताई, तुमचे प्रेम अनुभवण्यास मी न्यून पडत आहे. आमच्यावर भरभरून पे्रम करणार्या पू. अश्विनीताईंना कृतज्ञतापूर्वक नमस्कार !’
– सौ. अंजली झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (नोव्हेंबर २०१९)
पू. अश्विनीताई, न्यावे सत्वर गुरुचरणी आम्हाला ।
ज्यांची असे सर्वांवर अपार प्रीती ।
कशी वर्णू त्यांची शब्दांत महती ।। १ ।।
शरण जाऊन त्यांना मन हे प्रार्थिते ।
अशीच राहू द्या आम्हावर ही कृपादृष्टी ।। २ ।।
जन्मदिनी झाली हो आज वृष्टी ।
न्हाऊन निघाली आनंदात अवघी सृष्टी ।। ३ ।।
घ्यावे जवळी या अज्ञानी लेकराला ।
न्यावे सत्वर गुरुचरणी आम्हाला ।। ४ ।।
– श्री. पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |