जागतिक आतंकवादाच्या विरोधात भारताची भूमिका सक्रीय ! – विनोदकुमार सर्वोदय, गाझियाबाद, उत्तरप्रदेश
‘ही खेदाची गोष्ट आहे की, जागतिक आतंकवादाला नियंत्रित करण्यासाठी ७२ देशांचे ‘नो मनी फॉर टेरर’ (आतंकवादासाठी अर्थपुरवठा न करणे) याविषयीचे संमेलन देहलीत होत आहे. काही दिवसांपूर्वी देहलीत संयुक्त राष्ट्रांची आतंकवादविरोधी समिती अणि इंटरपोल यांचेही एक महत्त्वाचे संमेलन झाले. हे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही की, जेव्हापासून केंद्रात भाजपशासित नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले आहे, तेव्हापासून भारत सरकार जागतिक जिहादने पीडित राष्ट्रांना संघटित करून त्यांना ‘आतंकवादमुक्त’ करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. ‘आपल्या देशाला आतंकवादमुक्त करायचे असेल, तर त्यासाठी जगाला संघटित करावेच लागेल’, हे लक्षात घेऊन भारताचे पंतप्रधान सतत साहसपूर्ण प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर स्वत: सहभागी होऊन विविध पीडित देशांना प्रभावीपणे सतर्क केले आणि करत आहेत. अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि इस्रायल आदी देश जागतिक आतंकवादाच्या विरुद्ध सकारात्मक धोरण बनवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. भारताच्या प्रतिनिधींनीही संयुक्त राष्ट्रांमध्ये आतंकवादाच्या प्रश्नावर आक्रमकपणे पाकिस्तानसह अनेक देशांना चेतावणी दिली आहे.
येत्या काळात आतंकवादाच्या मुळावर प्रहार करण्यासाठी ‘नो एज्युकेशन फॉर टेरर’ (आतंकवादासाठी शिक्षण नको) या विषयावर संमेलन आयोजित केल्यास आतंकवादावर अंकुश लावण्यास अधिक यश मिळेल. आतंकवाद्यांचे मन आणि बुद्धी यांमध्ये अमानवीय अत्याचार करण्याचे बीजारोपण प्रामुख्याने इस्लामी शिक्षणाच्या माध्यमातूनच करण्यात येते.’ (१८.११.२०२२)