वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील देव दीपावलीच्या कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सन्मान
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ‘पंचचक्र हनुमान चालीसा’ आणि ‘केंद्रीय देव दीपावली महासमिती’ यांच्या वतीने देव दीपावलीचा कार्यक्रम सूरजकुंड येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांचा पुष्पहार अन् स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे समाजात राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्या अन्य मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी ज्ञानवापी प्रश्नावर आंदोलन करणारे श्री. सोहनलाल आर्य आणि सौ. सीता साहू याही उपस्थित होत्या.
क्षणचित्रे
१. सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि सौ. प्राची जुवेकर यांचे आगमन होत असतांना आयोजन समितीने ‘हर हर महादेव’चा जयघोष करून त्यांचे स्वागत केले.
२. श्री हनुमान मंदिराच्या १०० वर्षांच्या पुजार्यांचा सन्मान सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते करण्यात आला.