राजीव गांधी यांच्या मारेकर्यांच्या सुटकेच्या संदर्भात काँग्रेस प्रविष्ट करणार पुनर्विचार याचिका !
नवी देहली – माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांच्या मारेकर्यांच्या सुटकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसकडून टीका होऊ लागल्यानंतर केंद्र सरकारने गेल्या आठवड्यातच सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली आहे. ११ नोव्हेंबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने नलिनी, रविचंद्रन्, मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस या राजीव गांधी यांचा हत्येमध्ये हात असल्याचे सिद्ध झालेल्या ६ दोषींना सोडण्याचा निर्वाळा दिला होता.