इंडोनेशियामधील भूकंपामध्ये ४६ जण ठार, ७०० हून अधिक जण घायाळ

जकार्ता (इंडोनेशिया) – येथे झालेल्या भूकंपामध्ये आतापर्यंत ४६ जण ठार झाले आहेत, तर ७०० हून अधिक लोक घायाळ झाल्याचे वृत्त आहे. या भूकंपामुळे राजधानी जकार्तासह आजूबाजूच्या परिसरात लोक घाबरून बाहेर आले असून त्यांनी इमारती रिकाम्या केल्या आहेत. ‘रिक्टर स्केल’वर भूकंपाची तीव्रता ५.६ इतकी होती आणि त्याचा केंद्रबिंदू जावाच्या सियांजूरमध्ये होता.