स्वतःच्या घरी झालेला भाजीपाला हा सर्वार्थाने उत्कृष्ट आहार !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘आपल्या घरच्या लागवडीमध्ये पिकवलेला भाजीपाला आणि फळे हा आपल्यासाठी सर्वार्थाने उत्कृष्ट आहार आहे. ‘उत्तम आहार कसा असावा?’, याचे निकष सांगतांना ‘तो Regional (आपल्या प्रदेशात उत्पन्न झालेला), Seasonal (ऋतुनूसार उत्पन्न झालेला), Original (नैसर्गिकपणे उत्पन्न झालेला) असावा’, असे म्हटले जाते. आपल्या घरच्या लागवडीतील पिके वरील तीनही निकष पूर्ण करतात. परंपरेने पिकणारे स्थानिक अन्नधान्य आपल्या आरोग्यासाठी सर्वाधिक योग्य असते. ज्या प्रदेशामध्ये तेथील वातावरणानुसार जे खाणे योग्य, ते सर्व तेथे पुष्कळ प्रमाणात पिकते, उदा. कोकणात रहाणार्यांसाठी काश्मीरमध्ये होणार्या सफरचंदापेक्षा कोकणातील केळी, पपई यांसारखी फळे खाणे अधिक योग्य ठरते आणि त्यांची लागवडही सहज करता येते.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (५.११.२०२२)