नवविवाहित हिंदु-मुसलमान जोडप्याने विवाहानंतरचा समारंभ थांबवला !
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर परिसरात शांतता राखण्यासाठीचा प्रयत्न !
युवती हिंदु , तर तिचा नवरा आहे मुसलमान !
वसई – येथे नवविवाहित हिंदु-मुसलमान जोडप्याने स्वतःचा विवाहानंतरचा समारंभ (रिसेप्शन) थांबवला. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर परिसरात शांतता राखण्यासाठी हा समारंभ त्यांनी थांबवला, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या सांगण्यानुसार हा समारंभ थांबवला नसता, तर परिसरात काही अनुचित घटना घडण्याची शक्यता होती. हा समारंभ आता पुढे ढकलण्यात आला आहे. हिंदु-मुसलमान जोडप्याने कुटुंबाच्या संमतीने १७ नोव्हेंबरला ‘कोर्ट मॅरेज’ केले होते. यातील युवती हिंदु असून तिचा नवरा मुसलमान आहे.