पाणी उष्ण (गरम) कि थंड प्यावे ?
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ९५
‘थंडीच्या दिवसांत उष्ण, तर उष्णतेच्या दिवसांत थंड पाणी प्यावे. थंड, म्हणजे शीतकपाटातील नव्हे. उन्हाळ्यात माठातील (मातीच्या मडक्यातील) पाणी प्यायल्याने मन प्रसन्न होते. अन्य ऋतूंमध्ये माठातील पाणी पिऊ नये. शिंका येणे, सर्दी, घशाकडे कफ येणे, ताप, दमा हे विकार असतांना साधे थंड (न उकळलेले) पाणी पिऊ नये. त्यांनी उकळलेले पाणी कोमट किंवा थंड करून प्यावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०२२)