डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर खात्यावरील बंदी उठली !
नवी देहली – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बंदी घातलेले ट्विटर खाते पुन्हा चालू करण्यात आले आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी यासाठी ट्विटरवर सर्वेक्षण केले होते. यामध्ये दीड कोटी लोकांनी ट्रम्प यांचे खाते पुन्हा चालू करण्यास पाठिंबा दिला होता. यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांचे खाते पुन्हा चालू केले.
जानेवारी २०२१ मध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवर आक्रमण केले होते. याचे ट्रम्प यांनी समर्थन केले होते. त्यानंतर ट्विटरने त्यांच्या खात्यावर बंदी घातली होती.
Reinstate former President Trump
— Elon Musk (@elonmusk) November 19, 2022