नवविवाहित हिंदु-मुसलमान जोडप्याचा विवाहानंतरचा समारंभ स्थानिक धार्मिक संघटनांनी थांबवला !
|
वसई – येथे नवविवाहित हिंदु-मुसलमान जोडप्याचा विवाहानंतरचा समारंभ (रिसेप्शन) स्थानिक धार्मिक संघटनांनी थांबवले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या संपादकाने यासंदर्भात ट्वीट प्रसारित केले होते. त्याने टि्वटरवर ‘लव्ह जिहाद’ हा ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्रेंड’ केला. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर परिसरात शांतता राखण्यासाठी हा समारंभ धार्मिक संघटनांनी थांबवला, असे पोलिसांनी सांगितले.
Following protests after the tweet of a news channel editor, a reception of a Hindu-Muslim couple has been cancelled in Maharashtra’s Vasai, the hometown of Shradhha Walkar and Aaftab Amin Poonawalahttps://t.co/o2pDbyddd6
— Hindustan Times (@htTweets) November 19, 2022
पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा समारंभ थांबवला नसता, तर परिसरात काही अनुचित घटना घडण्याची शक्यता होती. हा समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. यातील हिंदु-मुसलमान जोडप्याने कुटुंबाच्या संमतीने १७ नोव्हेंबरला ‘कोर्ट मॅरेज’ केले होते.