‘लंपी’ त्वचारोग नियंत्रणासाठी ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ मोहीम !
मोहिमेचा कालावधी ७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२
जळगाव – राज्यातील ‘लंपी’ त्वचारोग या सांसर्गिक रोगाचा प्रसार सातत्याने वाढत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी जनतेचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी राज्यभर ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ ही मोहीम राबवण्याचा निर्णय पशूसंवर्धन विभागाने घेतला आहे.
‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ या मोहिमेअंतर्गत राज्यातील बाधित शहरे, गावे, वाड्या वस्त्या, पाडे, तांडे येथील पशूधनाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून पशूपालकांना जैवसुरक्षा उपाय आणि अनुषंगिक आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वरील मोहीम ७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत राबवली जात आहे.